बिग बॉस मराठी सीजन २ची स्पर्धक हिना पांचाल हीला महिनाभरापूर्वी नाशिकच्या इगरपुरीमधील एका पार्टीतून अटक करण्यात आली होती. यावेळी तिच्यावर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचाही आरोप झाला होता. यानंतर हिना पांचाल हीने एका मुलाखतीत तिच्यावरील हे आरोप खोटे असून ती एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये फक्त सेलिब्रिटी गेस्ट म्हणून गेली होती. तिनं आयुष्यात कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेले नाही. असे स्पष्ट केले आहे. हे प्रकरण न्यायालयात असून तिला यावर फार काही बोलता येणार नाही. पण तिचा न्यायालयिन व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असं तिनं सांगितले. या birthday पार्टीत हिनाचा फोन ही हरवला. याशिवाय तिची गाडीसुद्धा अजूनही तिला ताब्यात मिळालेली नाही अशी माहितीही तिनं दिली आहे. हे सगळं घडत असताना बिग बॉस मराठीच्या घरातला तिचा मित्र शिव ठाकरे तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता. शिवने हीनाला झालेल्या अटकेबद्दल तिच्या कुटूंबियांना माहिती दिली. या काळात तिच्या कुटुंबाला आधार दिला.तसेच शिवनेच वकील शोधण्यास हिनाच्या कुटुंबाला मदत केली. असे हीनाने सांगितले. बिग बॉसच्या घरात आपल्याला शिव आणि हीना यांची मैत्री पाहायला मिळाली होती पण शिवने ही मैत्री बिग बॉसच्या घराबाहेरही जपलीये.
Chitrali vo
#HeenaPanchal #ShivThakre #Biggboss #RaveParty #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber